राष्ट्रकुल कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघातील अहिल्यानगरच्या खेळाडूंचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरव..

अहिल्यानगर, दि. १० (जिमाका):

अहमदाबाद (गुजरात) येथे दिनांक २३ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या राष्ट्रकुल कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय पुरुष कबड्डी संघाने ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.

Ad…

या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने श्रीलंका संघाचा ५४ विरुद्ध २० गुणांनी पराभव करून विजेतेपद मिळविले.

Ad..

या विजयामध्ये अंतिम सामन्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील अजित पवार यांनी ५ पकडी (टॅकल), तर आदित्य शिंदे व शिवम पठारे यांनी प्रत्येकी १० सुपर रेड गुणांचे योगदान देत भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

Ad..

या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय पुरुष कबड्डी संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील अजित पवार, आदित्य शिंदे व शिवम पठारे या तीन खेळाडूंचा जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

Ad..

या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करून देशाला सुवर्णपदक मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या या उल्लेखनीय क्रीडा कामगिरीमुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Ad..

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी तिन्ही खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच जिल्ह्यातील खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

Ad..

या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे तसेच क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे उपस्थित होते.

Ad..

अहिल्यानगर जिल्ह्यातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळविलेल्या या यशामुळे जिल्ह्यातील कबड्डी खेळाडू, प्रशिक्षक व क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या खेळाडूंचा सन्मान जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

Ad…

स्रोत:(जिल्हा माहिती कार्यालय)

Ad..

Leave a Reply