देवळाली प्रवऱ्यात अवैध दारू कारवाईदरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनाची तोडफोड; अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल..

दिनांक ५ नोव्हेंबर २०२६, अहिल्यानगर:

Ad..

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील वाडा परिसरात अवैध दारू विक्रीविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाच्या सरकारी वाहनाची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केल्याची घटना गुरुवारी (सायंकाळी ६:३० ते ७ वाजेच्या सुमारास) घडली आहे. या हल्ल्यामुळे महसूल व उत्पादन शुल्क वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Ad..

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क कोपरगाव विभागाचे पोलीस निरीक्षक संजय हांडे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक देवळाली प्रवरा येथील वाडा परिसरात अवैध दारू विक्रीवर छापे टाकण्यासाठी गेले होते.

Ad..

पथकातील अधिकारी व कर्मचारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत असताना, त्यांचे शासकीय वाहन रस्त्या कडेला उभे करण्यात आले होते.

Ad..

कार सुरू असताना अज्ञात इसमांनी अचानक या शासकीय वाहनाची काच फोडून त्याचे नुकसान केले. त्यानंतर अंधाराचा फायदा घेऊन संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला.

या धडक कारवाईच्या पथकात खालील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते: पोलीस निरीक्षक – संजय हांडे, पोलीस उपनिरीक्षक – रायचंद गायकवाड, एक्साईज जमादार – श्रीपती गाराळे, कॉन्स्टेबल – उत्तम काळे व इतर सहकारी कर्मचारी सहभागी होते.

Ad..

शासकीय कामात अडथळा निर्माण करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.

स्रोत:(प्रसिद्ध पत्र)

Ad..

Leave a Reply