कंडक्टर गिलकेला DM भापकरांकडून ‘चार्जशीट’; चौकशी सुरू. आंदोलनाला अखेर यश.!

२२ ऑक्टोबरच्या तीव्र आंदोलनानंतर प्रशासनाची मोठी कारवाई; चौकशी सुनावणीत कंडक्टर गिलकेवर कठोर कारवाईची टांगती तलवार…

दिनांक १ नोव्हेंबर २०२६,श्रीगोंदा:

श्रीगोंदा–त्र्यंबकेश्वर बसमध्ये प्रवासादरम्यान एका आजारी महिला प्रवाशाची अपप्रतिष्ठा व मानहानी करणाऱ्या वाहक गिलके यांच्याविरोधात छेडलेल्या तीव्र आंदोलनाला अखेर मोठे यश आले आहे. आंदोलकांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आणि केलेल्या पाठपुराव्यानंतर श्रीगोंदा आगार व्यवस्थापक (DM) प्रणव भापकर यांनी दोषी कंडक्टर गिलके याच्यावर अधिकृत आरोपपत्र दाखल केले असून, या प्रकरणाची अधिकृत चौकशी व सुनावणी सुरू करण्यात आली आहे. या कारवाईचे पत्र आंदोलकांना प्राप्त झाले आहे.

दिनांक ९ ऑक्टोबर रोजी एसटी बसमध्ये आजारी महिलेशी बेजबाबदार व अहंपणाचे वर्तन करून तिची मानहानी करणाऱ्या वाहक गिलकेवर कारवाई व्हावी, यासह आगारातील भंगार बसेस, घाणीचे साम्राज्य आणि मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा छळ यांसारख्या विविध मागण्यांसाठी २२ ऑक्टोबर २०२६ रोजी श्रीगोंदा बस आगाराबाहेर शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तीव्र आंदोलन पार पडले होते.

या आंदोलनात बसपाचे सुनील ओहोळ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकराइट) चे निलेश गायकवाड यांच्यासह विविध सामाजिक संघटना व पत्रकारांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. त्यावेळी DM भापकर यांनी ७ दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन दिले होते.

https://link.amazon/B05NJzN94

प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार चौकशी पूर्ण करत आगार व्यवस्थापक (DM) प्रणव भापकर यांनी वाहक गिलके याच्याविरोधात प्रशासकीय व शिस्तभंगाच्या कारवाईचे गंभीर आरोपपत्र बजावले आहे. या आरोपपत्राची एक अधिकृत प्रत आंदोलक प्रतिनिधींना सपूर्द करण्यात आली आहे.

सध्या या प्रकरणाची सुनावणी व सखोल चौकशी सुरू झाली असून, लवकरच या हियरिंग दरम्यान दोषी वाहकावर निलंबनासह कठोर प्रशासकीय कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

https://link.amazon/B0j4pLQvl

प्रशासनाने तात्काळ दखल घेत कंडक्टर गिलकेवर चार्जशीट दाखल केल्यामुळे बहुजन समाज पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकराइट), वंचित बहुजन आघाडी, पत्रकार संघ आणि आंदोलकांकडून आंदोलनाच्या या पहिल्या विजयाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

तथापि, “चार्जशीटनंतर सुरू झालेल्या सुनावणीत दोषी वाहक गिलकेवर लवकरात लवकर कठोर शिस्तभंगाची कारवाई न झाल्यास आणि आगारातील इतर मागण्या पूर्ण न झाल्यास आगामी काळात पुन्हा सनदशीर मार्गाने लढा उभारू,” असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

स्रोत:(नोटीस)

Leave a Reply