खामकरवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये नाहाटा – नागवडे युतीच्या किसान क्रांती समविचारी पॅनलचा विक्रमी मताधिक्याने विजय…

दिनांक १ नोव्हेंबर २०२६, श्रीगोंदा:

खामकरवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये किसान क्रांती समविचारी पॅनलचा १३/० विजय झाला असून पाचपुते गटाचा दारुण पराभव झाला आहे.

लोणी व्यंकनाथ येथील खामकरवाडी कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीमध्ये नाहाटा – नागवडे गटाची युती होऊन किसान क्रांती समविचारी आघाडी ने मोठ्या फरकाने विजय मिळवला.

https://www.amazon.in/dp/B0

काही तांत्रिक अडचणीमुळे बाळासाहेब नाहाटा अटकेत असताना सुद्धा त्यांचे चिरंजीव मितेश नाहाटा यांनी पॅनलचे नेतृत्व करीत नियोजनबद्ध पद्धतीने निवडणूक हाताळली. तसेच, नागवडे गटाचे संचालक श्री डी आर आबा काकडे व समविचारी आघाडीचे श्री भूषण साळवे यांना बरोबर घेत निवडणुकीत विजय खेचून आणला.

यामध्ये काळे मुकिंदा दत्तात्रय, खेडकर सुनील रामदास, खोमणे संतोष रामचंद्र, गव्हाणे केशव सोपान, जगताप गोरख आबासाहेब, मगर किरण दत्तात्रय, साळवे दत्तू बाबू, ओव्हाळ सविता विठ्ठल, पिसे प्रमिला दिलीप, शेलार सविता संतोष, ओव्हाळ नीता सदाशिव, साळवे भूषण सुरेश, कोळपे संतोष चंदर या सर्व  विजयी उमेदवारांचे ..

https://link.amazon/B01jXrpqQ

..नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री राजेंद्र दादा नागवडे, माजी आमदार श्री राहुल दादा जगताप पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री अण्णासाहेब शेलार, जिल्हा बँकेचे संचालक श्री दत्ताजी पानसरे आदींनी नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन केले आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply