श्रीगोंद्यात अन्न औषध प्रशासन (FDA) ची धडक कारवाई.., आता भेसळखोरांचे धाबे दणाणले..!

दिनांक २२ ऑक्टोबर २०२६,श्रीगोंदा:

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अन्नपदार्थ विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यव्यापी धडक मोहीम राबवली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून श्रीगोंदा तालुक्यातही कारवाई करण्यात आली आहे.

नाशिक विभागांतर्गत श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील ‘मे. चैतन्य किराणा हार्डवेअर‘ मधून ८७ किलो भगर निकृष्ट दर्जाची व भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनाने जप्त केली आहे. नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाकडून ही विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading