दिनांक २० ऑक्टोबर २०२६,श्रीगोंदा:
‘मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य’चे संस्थापक अध्यक्ष श्री. नितीनजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्रीगोंदा तालुका प्रमुख श्री. रावसाहेब डांगे यांच्या उल्लेखनीय आयोजनातून, श्रीगोंदा तालुक्यातील वडळी (मु. पो. वडळी, ग्रामपंचायत कार्यालय व दत्त मंदिर परिसर) येथे रविवारी (१८ ऑक्टोबर २०२६) एक भव्य महाआरोग्य शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून, ५५० हून अधिक नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली.
शिबिराचे उद्घाटन ‘मधु तारा’ प्रमुख श्री. नितीनजी शिंदे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भारत सरकारचे जीएसटीचे माजी प्रधान आयुक्त मा. श्री. शिवाजीराव हनुमंत डांगे यांनी भूषवले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मधुतारा पुणे जिल्हा प्रमुख श्री. अनिलजी दांगडे, श्रीगोंदा तालुका प्रमुख श्री. रावसाहेब डांगे, श्री. महेशजी डांगे, श्रीगोंदा महिला प्रमुख राणीताई डांगे, वडळी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सप्ताह कमिटीचे पदाधिकारी तसेच पंचक्रोशीतील असंख्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचा मानाचा फेटा, शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करून करण्यात आली.
अहिल्यानगर जिल्ह्याचे ‘महात्मा फुले जन आरोग्य योजने’चे जिल्हा समन्वयक डॉ. श्री. स्वप्नील तुपे सर यांच्या सहकार्यातून हे शिबिर पार पडले.

यामध्ये न्यू मेडिकेअर हॉस्पिटल, श्रीगोंदा, पाटील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, श्रीगोंदा, मातोश्री हॉस्पिटल, श्रीगोंदा, विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कर्जत, लोकमान्य हॉस्पिटल, मिरजगाव (कर्जत) या रुग्णालयांच्या डॉक्टरांनी व नर्स स्टाफने अत्यंत आत्मीयतेने सेवा बजावत रुग्णांची तपासणी केली.
या शिबिरात रक्तदाब (Blood Pressure), मधुमेह (Sugar), स्त्रीरोग, अस्थिरोग तसेच हाडांची तपासणी अशा विविध महत्त्वाच्या आरोग्य चाचण्या मोफत करण्यात आल्या.

श्रीगोंदा तालुक्यात पहिल्याच यशस्वी शिबिराचे उत्तम नियोजन केल्याबद्दल आणि खऱ्या अर्थाने गरजू, रंजल्या-गांजल्या व ज्येष्ठांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवल्याबद्दल ‘मधु तारा’ प्रमुख श्री. नितीनजी शिंदे यांनी तालुका प्रमुख श्री. रावसाहेब डांगे यांचे विशेष अभिनंदन केले.
तसेच, श्रीगोंदा, मिरजगाव आणि कर्जत तालुक्यातील सर्व रुग्णालयांना एकत्र आणून मोठे सहकार्य केल्याबद्दल जिल्हा समन्वयक डॉ. स्वप्नील तुपे सर आणि सहभागी सर्व वैद्यकीय टीमचे त्यांनी आभार मानले. ‘मधु तारा’च्या स्नेही सोबती उमाताई यांच्या सहकार्यामुळेच श्रीगोंदा तालुका मधु तारा कुटुंबाशी जोडला गेला असल्याची आठवणही त्यांनी यावेळी काढली.
कार्यक्रमादरम्यान, १५० महिला बचत गटांची स्थापना करून महिला सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सौ. राणीताई डांगे यांची ‘मधु तारा’ संस्थेच्या श्रीगोंदा महिला प्रमुख म्हणून अधिकृत घोषणा करण्यात आली.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
