दिनांक १७ ऑक्टोबर २०२६,श्रीगोंदा:
महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘सखी संमती फाउंडेशन’च्या वतीने श्रीगोंदा शहराच्या इतिहासात प्रथमच एका भव्य-दिव्य दांडिया स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला श्रीगोंदा परिसरातील महिलांचा प्रचंड व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या दिमाखदार सोहळ्याला आमदार श्री. हेमंत ओगले, पोलीस निरीक्षक श्री. सानप, माजी नगराध्यक्ष सौ. शुभांगी पोटे, श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री. प्रशांत ओगले, नगरसेविका सौ. दिपाली बोरुडे आणि उपसरपंच श्री. किरण लकडे यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली.

विशेष म्हणजे, लोकप्रिय सिनेअभिनेत्री रेवती लेले यांच्या विशेष उपस्थितीने या कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढवली आणि महिलांमध्ये एकच उत्साह पाहायला मिळाला.
विविध गटांमध्ये पार पडलेल्या या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत
- प्रथम क्रमांक: हिरकणी ग्रुप, बेलवंडी — (₹ १०,००१ रोख व मानचिन्ह)
- द्वितीय क्रमांक: सिद्धिविनायक ग्रुप — (₹ ७,००१ रोख व मानचिन्ह)
- तृतीय क्रमांक: नवरंगी नारी ग्रुप — (₹ ५,००१ रोख व मानचिन्ह)
- उत्कृष्ट वेशभूषा: प्रियांका वाघमारे — (मेडल, ट्रॉफी व ₹ १,००१)
- वैयक्तिक सादरीकरण: निकिता शर्मा — (मेडल, ट्रॉफी व ₹ १,००१)
- आदिका उदमले — (टेबल फॅन)
- स्नेहा वाबळे — (मिक्सर)
- मीना क्षीरसागर — (हॉटकेस सेट)
हा यशस्वी कार्यक्रम सखी संमती फाउंडेशनच्या संस्थापक सौ. हेमांगी प्रशांत ओगले, सौ. रुपा लौकिक मेहता आणि सौ. प्रणाली सुमेध गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ‘त्याचा’ महिला ग्रुपच्या सर्व सदस्यांच्या मोलाच्या सहकार्याने पार पडला.

या स्पर्धेत उत्साहाने सहभागी झालेल्या सर्व महिला स्पर्धकांचे, मार्गदर्शन व उपस्थिती लाभलेल्या सर्व मान्यवरांचे आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतलेल्या प्रत्येकाचे फाऊंडेशनच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
स्रोत:(प्रसिध्दी पत्र)
