दुष्काळात शेतकऱ्यांची छळवणूक थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार.! शिवसेना-युवासेनेचा इशारा: तहसीलदार कार्यालयात दिलं निवेदन; बँका व फायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या वसुलीविरोधात आक्रमक पवित्रा…

दिनांक १५ ऑक्टोबर २०२६, श्रीगोंदा:

सध्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह श्रीगोंदा तालुका व अहिल्यानगर जिल्ह्यात भीषण दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या कठीण काळात दुष्काळात होरपळणाऱ्या सर्वसामान्य शेतकरी व कामगारांकडून बँका, खासगी सावकार, महिला बचत गट, सूक्ष्म वित्त संस्था (स्मॉल फायनान्स कंपन्या) आणि पतसंस्था यांनी थकीत कर्ज किंवा हप्त्यांची (EMI) कोणतीही वसुली करू नये आणि कोणतीही सक्ती करण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब व महसूल मंत्री श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी दिलेले आहेत.

https://link.amazon/B0iKmycHP

परंतु, शासनाच्या या निर्देशांचे उघडपणे उल्लंघन करून अनेक ठिकाणी बँका व स्मॉल फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच खासगी सावकार शेतकऱ्यांच्या घरी जाऊन वसुलीसाठी तगादा लावत आहेत व त्यांना प्रचंड मानसिक त्रास देत आहेत. या गैरप्रकाराविरोधात युवासेना श्रीगोंदा तालुक्याच्या वतीने श्रीगोंदा तहसीलदार कार्यालयात माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले.

याबाबत अधिक माहिती देताना युवासेना तालुका प्रमुख इंजि. निलेश उत्तमराव गोरे यांनी सांगितले की, “जर प्रशासनाने यावर तत्काळ योग्य कारवाई केली नाही आणि शासकीय आदेशांची काटेकोर अंमलबजावणी झाली नाही, तर शेतकरी व कामगारांच्या हक्कासाठी शिवसेना-युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल.”

निवेदन देतेवेळी युवासेना तालुका प्रमुख इंजि. निलेश उत्तमराव गोरे, उपजिल्हा प्रमुख हेमंत लोखंडे, युवासेना तालुका संघटक प्रतीक बोरकर, उपतालुकाप्रमुख शुभम गायकवाड, मांडवगण गटप्रमुख गणेश शिंदे, अविनाश घोडके, कुणाल शिरवाळे, किरण बनसुडे, विलास होले, मंगेश साळुंके, अक्षय मखरे, ऋषी रासकर, सिद्धार्थ घोडके, युवराज साबळे, पंकज बनसुडे, वैभव गायकवाड, शिवानी साळुंके, संदीप बनसुडे यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply