दिनांक १७ ऑक्टोबर २०२६, श्रीगोंदा
बेलवंडी एमआयडीसी परिसरातील माती-मुरूम वाहतूक करणाऱ्या डंपरच्या हप्त्यावरून पिसोरे-चिंभळा रस्त्यावर हिरवे बंधूंवर कोयता, तलवार व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणातील फरार आरोपी सुजित इथापे याला बेलवंडी पोलिसांनी मध्यरात्री कुकडी कारखाना परिसरतून सापळा रचून शिताफिने अटक केली.

दि. १० सप्टेंबर रात्री सुमारे ११.२५ वाजता निखिल, नितीन आणि अभिजित हिरवे हे चारचाकी वाहनातून जात असताना आरोपींनी स्विफ्ट कार आडवी लावून त्यांना अडवले. मुरूम व मातीचे डंपरचे हप्ते न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून आरोपींनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला होता.

या प्रकरणी निखिल हिरवे यांच्या फिर्यादीवरून सुजित इथापे, सचिन उर्फ चिंग्या भागवत, गणेश गायकवाड, नितीन पवार यांच्यासह अन्य अनोळखी व्यक्तींविरुद्ध बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील सहा आरोपींना बेलवंडी पोलिसांनी अटक केली होती. परंतु या गुन्ह्यातील मास्टर माईंड असलेला सुजित इथापे हा फरार होता.
फरार आरोपींचा शोध घेत असताना सुजित इथापे हा कुकडी कारखाना परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
हि यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर आणि पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे. कॉ.दादासाहेब क्षीरसागर, पो. हे. कॉ.भाऊसाहेब यमगर, पो. कॉ. विनोद पवार, पो. ना. शरद गांगार्डे तसेच अहिल्यानगर दक्षिण मोबाईल सेलचे पो. कॉ. राहुल गुंडू, पो. कॉ. अरुण सांगळे यांच्या मदतीने केली.
स्रोत:(प्रसिद्धीपत्र)
