बनावट AI वन्यप्राणी व्हिडिओ तयार करणाऱ्यांवर होणार कारवाई: पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे..

दिनांक २८ नोव्हेंबर २०२५, अहिल्यानगर:

जिल्ह्यात मानव-बिबट्या संघर्ष वाढत असताना, AI-आधारित बनावट वन्यप्राणी व्हिडिओ तयार करून नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिले. ते जिल्हा व्याघ्र कक्ष समितीच्या बैठकीत बोलत होते.

  • वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना पोलिसांकडून शस्त्र हाताळणीचे प्रशिक्षण दिले जाईल.
  • जनजागृतीसाठी पोलिसांच्या व्हॉट्सअ‍ॅप गटांमध्ये वनअधिकाऱ्यांचा समावेश केला जाईल.
  • अपघात टाळण्यासाठी ‘ब्लॅक स्पॉट’ ओळखणे आणि विहिरींना सुरक्षित कठडे बांधण्याचे आवाहन केले जाईल.
  • मानव-वन्यजीव संघर्षाच्या वेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची मदत तत्परतेने उपलब्ध असेल.
  • वनविभाग-पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने मॉक ड्रिल आणि तालुकास्तरीय समन्वय समित्या स्थापन केल्या जाणार.वन आणि वन्यजीव संवर्धनात रुची असलेल्या व्यक्तींना मानद ‘वन पाटील’ म्हणून निवडण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
  • या बैठकीत उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल आणि विभागीय वनअधिकारी डॉ. अजित साजणे यांच्यासह समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते.

स्रोत:(जिल्हा माहिती कार्यालय)

https://www.amazon.in/dp/B09N3ZNHTY/ref=cm_sw_r_as_gl_apa_gl_i_CEKYKVPED1MFZWA1J9P0?linkCode=ml1&tag=nirbhidkalam-21&linkId=0dd21f97b6f10fd0d21e57b1f34bca21

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading