सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांची अचानक तपासणी करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे निर्देश ..

दिनांक २८ नोव्हेंबर २०२५,अहिल्यानगर:

जिल्ह्यातील घटते लिंग गुणोत्तर रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांची अचानक तपासणी करण्याचे आणि जन्म-मृत्यू नोंदी वेळेत करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी सांगितले की, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या केंद्रांवर कठोर कारवाई करावी.
या बैठकीत खालील प्रमुख सूचनाही देण्यात आल्या:

https://amzn.to/4oGDY3T
  • एचपीव्ही लसीकरण मोहीम: १४ वर्षे पूर्ण झालेल्या मुलींसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेणे.
  • प्रसूती नोंदणी: सर्व खासगी रुग्णालयांनी प्रसूतींची नोंदणी आरोग्य वाहिनी माहिती प्रणाली (HMIS) संकेतस्थळावर अनिवार्यपणे करणे.
  • लसीकरण: नवजात बालकांना २४ तासांत हेपेटायटिस-बी (शून्य) लसीचा डोस देणे.
  • क्षयरोग: खासगी डॉक्टरांनी क्षयरोग रुग्णांची माहिती व उपचार अहवाल वेळेवर सादर करणे.
  • गरोदर मातांचा पाठपुरावा: पाठपुराव्यात ढिलाई न करता प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत. जिल्ह्यातील आरोग्य निर्देशांक सुधारण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

स्रोत:(जिल्हा माहिती कार्यालय)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading