महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी पत्रकार अंकुश शिंदे.


श्रीगोंदा प्रतिनिधी :-

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी श्रीगोंदा येथील पत्रकार अंकुश तुकाराम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. १ सप्टेंबर २०२६ पासून त्यांची नियुक्ती करण्यात आली असून, महासंघाचे राज्याध्यक्ष पत्रकार डॉ. समीर राजे यांच्या हस्ते शिंदे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या कार्यालयात राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. तसेच अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदासाठी योग्य व्यक्तीच्या निवडीबाबत चर्चा होऊन अंकुश शिंदे यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.
यावेळी राज्याध्यक्ष डॉ. समीर राजे, विठ्ठल तांबे, सूरजकुमार बागडे, दीपक चव्हाण, राजेंद्र पवार, अरुणकुमार मोटे, विक्रम भोर, विजय मोटे, गिरीश वळवी, विजयकुमार हरिचंद्रा, सागर पवार, नवनाथ खिलारे, मोहंमद मुलाणी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रकारितेतील योगदान आणि सामाजिक बांधिलकीची दखल
पत्रकार अंकुश शिंदे यांनी पत्रकारिता क्षेत्रात केलेले योगदान तसेच सामाजिक बांधिलकीची दखल घेऊन राज्य नेतृत्वाने त्यांच्यावर अहिल्यानगर जिल्ह्याची जबाबदारी सोपवली आहे. जिल्ह्यातील पत्रकारांचे प्रश्न शासन व प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणे, पत्रकारांच्या हक्कांचे रक्षण करणे, पत्रकारांना संघटित करणे आणि महासंघाचे कार्य जिल्हाभर मजबूत करणे, हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट असणार आहे.
शिंदे यांच्या निवडीबद्दल श्रीगोंदा तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी माधव बनसोडे, चंदन घोडके, शिवाजी साळुंके, श्रीरंग साळवे, दादा सोनवणे, अनिल तुपे, अमर घोडके, अमोल झेंडे, किशोर मचे, प्रमोद आहेर, अमोल बोरगे, सचिन शिंदे, संदीप उमाप आदी पत्रकार उपस्थित होते.
दरम्यान, कार्यसम्राट आमदार विक्रम पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, घनशाम शेलार, बाबासाहेब भोस, मनोहर पोटे, नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस, टिळक भोस, स्मितल भैय्या वाबळे आणि प्रशांत दरेकर यांनी अंकुश शिंदे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading