ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित*



गोवा, दि. २० ऑगस्ट २०२६ :
साखर उद्योगाच्या विकासात उल्लेखनीय योगदान, व्यावसायिक उत्कृष्टता आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी केलेल्या कार्याची दखल घेत ओंकार शुगर ग्रुपला ‘Industry Excellence Award’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

The Sugar Technologists’ Association of India (STAI), नवी दिल्ली यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. STAI च्या ८४व्या वार्षिक अधिवेशन व International Sugar Expo 2026 अंतर्गत दिनांक १८ ते २० ऑगस्ट २०२६ दरम्यान गोवा येथील Dr. Shyama Prasad Mukherjee Indoor Stadium येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

*या सोहळ्यात गोव्याचे मुख्यमंत्री मा. श्री. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ओंकार शुगर ग्रुपला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.ओंकार शुगर ग्रुपच्या वतीने हा मानाचा पुरस्कार ओंकार शुगर ग्रुपचे संचालक मा. श्री. ओमराजे बोत्रेपाटील यांनी स्वीकारला.* यावेळी STAI चे अध्यक्ष, SISSTA चे अध्यक्ष तसेच साखर उद्योगाशी संबंधित विविध संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते.

सदर पुरस्कारामध्ये साखर उद्योगाच्या विकासातील व्यावसायिक उत्कृष्टता व उल्लेखनीय योगदानाची विशेष दखल घेण्यात आली आहे. ओंकार शुगर ग्रुपकडून साखर उद्योगासोबतच इथेनॉल, बायोएनर्जी, आधुनिक तंत्रज्ञान, शाश्वत विकास आणि उद्योगविस्तार यांना दिले जाणारे प्राधान्य या यशामागील महत्त्वाचा घटक मानला जात आहे.

या अधिवेशनास देशातील साखर उद्योगातील तज्ज्ञ, तंत्रज्ञ, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, उद्योजक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. साखर उद्योगातील ज्ञान, तंत्रज्ञान, नवकल्पना आणि भविष्यातील संधी यावर या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात विचारविनिमय करण्यात आला.

ओंकार शुगर ग्रुपला मिळालेला हा पुरस्कार समूहाच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर झालेली दखल असून, भविष्यात अधिक आधुनिक, तंत्रज्ञानाधारित आणि शाश्वत साखर उद्योग उभारण्याच्या प्रवासाला निश्चितच नवी प्रेरणा देणारा आहे.

या उल्लेखनीय सन्मानाबद्दल ओंकार शुगर ग्रुपचे चेअरमन मा. श्री. बाबुराव बोत्रेपाटील, संचालक मा. श्री. ओमराजे बोत्रेपाटील तसेच समूहातील सर्व अधिकारी, कर्मचारी, कामगार, ऊस उत्पादक शेतकरी आणि हितचिंतकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading