दिनांक २४/ऑगस्ट श्रीगोंदा /पुणे :
पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे एका तरुणीला नोकरीचे प्रलोभन दाखवून डांबून ठेवत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी श्रीगोंदा तालुक्यातील ३ संशयितांसह एकूण सात आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.
पीडित तरुणीला आयटी क्षेत्रातील नोकरीचे आमिष दाखवून शिरूर येथील ‘मार्बल इन लॉजिंग’ येथे नेण्यात आले. तेथे तिला गुंगीचे औषध देऊन सलग तीन दिवस तिच्यावर अत्याचार करण्यात आला.

निष्पन्न झालेल्या आरोपींमध्ये अजय घेडगे (रा. माठ, ता. श्रीगोंदा), ऋषिकेश ढवळे व सागर ढवळे (दोघे रा. ढवळेवाडी, ता. श्रीगोंदा) यांचा समावेश आहे. (इतर आरोपी शिरूर व पारनेर परिसरातील आहेत).
पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गवारी या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, फरार आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
स्रोत:(ऑनलाइन वृत्त)
