राहुल गायकवाड यांची ‘कैकाडी समाज युवक संघटना’ महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी निवड..

दिनांक २४ ऑगस्ट २०२६, श्रीगोंदा/अहिल्यानगर:

राहुल गायकवाड यांची कैकाडी समाज युवक संघटना (महाराष्ट्र राज्य) च्या उपाध्यक्षपदी अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या विशेष उपस्थितीत त्यांना नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले.

या प्रसंगी आमदार संग्राम भैय्या जगताप यांना कैकाडी समाजाचा पारंपरिक व्यवसाय दर्शवणारी डाली आणि कोयता भेट देऊन त्यांचे विशेष लक्ष वेधण्यात आले आणि त्यांचा सन्मान करण्यात आला.

दिनांक १३ मार्च रोजी वराह पालन जन आक्रोश क्रांती मोर्चाचे नेतृत्व माननीय आमदार संग्राम भैय्या जगताप यांनी केले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली कैकाडी समाजाने या आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, ज्याची दखल घेत आमदारांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. तर, येणाऱ्या काळात कैकाडी समाजासाठी वराह पालन आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, या प्रमुख मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल. असेही स्पष्ट करण्यात आले.

कैकाडी समाजावर लादलेले क्षेत्रीय बंधन (म्हणजेच विदर्भामध्ये अनुसूचित जाती (SC) आणि उर्वरित महाराष्ट्रात विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) असे असणारे वर्गीकरण) उठवण्यासाठी आणि वराह पालन अनुदान योजना थेट समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. समाजाच्या प्रत्येक मूलभूत प्रश्नावर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. असेही नमूद करण्यात आले.

या संपूर्ण कार्यक्रमात व निवडीबद्दल मार्गदर्शक रवी भाऊ गायकवाड, बापूशेठ माने, नितीन भाऊ गायकवाड, प्रदीप पप्पू जाधव, विकी भाऊ जाधव आणि संजू भाऊ गायकवाड (मंठा) यांनी राहुल गायकवाड यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading