श्रीगोंदा, २० जुलै २०२५:
श्रीगोंदा तालुक्यात सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे, तरुण कार्यकर्ते कुणाल शिरवाळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा पवार गट) यांच्या सामाजिक सेलचे तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती १८ जुलै २०२५ रोजी श्रीगोंदा येथील शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष (सामाजिक न्याय – अहिल्यानगर) बंडू तात्या जगताप यांच्या शुभहस्ते शिरवाळे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये विशाल घोडके, रमण सोनवणे, सुनील शिंदे, पप्पू घोडके, श्रीकांत घोडके, सुरज पारधे, सौ. शिरवाळे, शेंडगे ताई, दस्तगीर इनामदार, युवराज गायकवाड, देविदास डेबरे, अक्षय पिंपळे, शुभम दीक्षित, परशुराम घोडके, अनिल औटी, लखन सूर्यवंशी, पप्पू आमटे यांचा समावेश होता.

कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ साहित्यिक आणि क्रांतीकारक विचारवंत अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून करण्यात आली. या पूजनात बंडू तात्या जगताप, पत्रकार चंदन घोडके, अविनाश घोडके आणि अनेक पत्रकार बांधव सहभागी झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल घोडके यांनी केले, तर अध्यक्षीय मनोगत बंडू तात्या जगताप यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी तरुण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, “संघटन कौशल्य विकसित करा, समाजातील अडचणींमध्ये भाग घ्या. मात्र आपल्या कुटुंबीयांची जबाबदारी आणि आर्थिक विवंचना लक्षात घेत चळवळ करा. उपाशीपोटी कार्यकर्ता फार काळ टिकत नाही.“

तसेच पत्रकार चंदन घोडके यांनी देखील सामाजिक जबाबदारी आणि पत्रकारितेच्या भूमिकेबाबत आपले विचार मांडले.
कार्यक्रमात पत्रकार चंदन घोडके यांचा “आदर्श पत्रकारिता पुरस्कार” मिळाल्याबद्दल शाल, पुष्पगुच्छ व फेटा देऊन सन्मान करण्यात आला. यासोबत पत्रकार अमोल झेंडे, पत्रकार अमर घोडके, पत्रकार राजू शेख, पत्रकार अनिल तुपे, पत्रकार पीटर रनसिंग यांचाही गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या समारोपात कुणाल शिरवाळे यांना औपचारिकरित्या तालुकाध्यक्ष (सामाजिक सेल) पदाची जबाबदारी सुपूर्त करण्यात आली. यावेळी त्यांनी सांगितले, “माझ्यावर सोपवलेली ही जबाबदारी मी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडेन. पक्षाच्या संघटनात्मक सूचनांचे काटेकोर पालन करीत समाजहितासाठी सातत्याने कार्यरत राहीन.“
स्रोत:(आयोजित कार्यक्रम)
