गौरी शुगरच्या संचालिका रेखा बोत्रे यांना ‘महिला आयकॉन पुरस्कार’ने सन्मान— साखर उद्योगातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

दिनांक २० जुलै,२०२५ श्रीगोंदा (प्रतिनिधी):

हिरडगाव (ता. श्रीगोंदा) येथील गौरी शुगर अॅण्ड डिस्टिलरीजच्या संचालिका रेखा बाबुराव बोत्रेपाटील यांना साखर उद्योगातील उल्लेखनीय योगदानाबद्दल महिला आयकॉन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

कोल्हापूर येथे पार पडलेल्या भव्य सोहळ्यात नॅशनल फेडरेशन को. शुगरचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन पाटील, भारतीय शुगरचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे, सचिव संग्रामसिंह शिंदे, उपाध्यक्ष डी. एम. रासकर व सदस्य रणवीरसिंह शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

गौरी शुगर प्रकल्पाने अडचणीच्या काळात घेतलेली भरारी, हा यशाचा प्रवास ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रेपाटील यांच्या दूरदृष्टीतून आणि रेखाताई बोत्रे यांच्या सक्रिय सहभागातून शक्य झाला.

संचालिका रेखा बोत्रे यांनी कारखान्याच्या दैनंदिन कामकाजात स्वतः वेळ देत आमूलाग्र बदल घडवून आणले. या नेतृत्वाखाली कारखान्याने गाळप हंगाम २०२३-२४ आणि २०२४-२५ मध्ये उच्चांकी गाळप करताना शेतकऱ्यांना उसाला उच्च बाजारभाव दिला. तसेच तोडणी, वाहतूकदार व कामगारांनाही न्याय देण्यात आला.

कार्यक्रमास कारखान्याचे जनरल मॅनेजर रोहीदास यादव, खातेप्रमुख भास्कर काकडे, योगेश राऊत, प्रल्हाद मोढवे, संदीप जाधव, नवनाथ देवकर, विकास क्षिरसागर, समीर जकाते, शशीकांत चकोर दौडकर, ज्योतीराम रोडे, प्रमोद ननवरे, अजित शेळके, रामलिंग खांडेकर, राजेंद्र वाळके, सुनील खेडकर, नितीन दरेकर, संभाजी चव्हाण, सचिन गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading