दिनांक ३१ जुलै २०२५,श्रीगोंदा (अहिल्यानगर:
अग्नीपंख फौंडेशनच्या वतीने श्रीगोंदा येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘विद्यार्थी प्रेरणा उत्सवा’मध्ये विविध स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, व नवोदय प्रवेशपूर्व परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात राष्ट्रीय जलतरणपटू राजेश्री गुगळे, एमपीएससी, एनएमएमएस, शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा आणि इस्रो सहलीसाठी निवड झालेल्या तसेच नवोदय प्रवेशपूर्व परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

हा सन्मान ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर, गटविकास अधिकारी राणी फराटे, गटशिक्षणाधिकारी कुसुमकुमारी, अनिल शिंदे, आणि सत्यजित मच्छिंद्र यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमात राजेश्री गुगळे (आढळगाव), अनुष्का फराटे (मांडवगण), पूजा लगड, संदीप भापकर (कोळगाव), श्रेयस खोमणे (लोणीव्यंकनाथ), भक्ती वाणी (ढोरजे), प्राजक्ता कोंथिबीरे, उमेश औटी यांच्यासह एकूण २३५ विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी विशेष सन्मान उपक्रमात चैताली श्रीराम (कोकणगाव) हिला सायकल, राखी कुचेकर (काष्टी) हिला स्पर्धा परीक्षेची पुस्तके, आणि अस्मिता लगड (तांदळी) हिला अकरावीचे शालेय साहित्य व गणवेश भेट देण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. संजय कळमकर म्हणाले, “विद्यार्थ्यांमध्ये असलेले कौशल्य आणि कला ओळखून त्यांना योग्य संधी दिल्यास उज्वल भविष्य निर्माण होऊ शकते. शिक्षक आणि पालकांनी एकत्रित प्रयत्न केल्यास गुणवत्तेचे परिणाम नक्कीच येतील.”

गटविकास अधिकारी राणी फराटे यांनी अग्नीपंख फौंडेशनच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, “ही संस्था शाळा, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या विकासासाठी उत्कृष्ट काम करत आहे. अशा संस्थांना पाठबळ दिल्यास समाजात परिवर्तन घडेल.” प्रास्ताविक राजकुमार इथापे यांनी केले. कार्यक्रमात गटशिक्षणाधिकारी राजेश्री गुगळे, कुसुमकुमारी कानडी, अनिल शिंदे यांचे मनोगत झाले.

या कार्यक्रमास मोहनराव आढाव, हौसराव भोस, प्रशांत गोरे, अकुंश घाडगे, भाऊसाहेब वाघ, नवनाथ दरेकर, नवनाथ खामकर, अमोल गव्हाणे, मयुर गोरखे, शिवदास शिंदे, दादासाहेब कोल्हे, किसन वऱ्हाडे, भावना मोहीते, प्रमिला गावडे, निलेश मुनोत, आणि सूरज तुपे यांची उपस्थिती होती.
सूत्रसंचालन साक्षी पाचपुते आणि सहदेव खामकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. संजय लाकूडझोडे यांनी मानले.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
