महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात भित्तिपत्रकातून स्वातंत्र्यलढ्यातील वीरांगनांना अभिवादन



श्रीगोंदा :  महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातील इतिहास विभागाच्यावतीने ९ ऑगस्ट क्रांतिदिन आणि १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘भारतातील अग्निशिखा – भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील महिलांचा सहभाग’ या विषयावर भित्तिपत्रक तयार करण्यात आले. या भित्तिपत्रकाचे उद्घाटन माजी मंत्री मा. बबनरावजी पाचपुते यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी आमदार मा. राहुल जगताप, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मा. बाबासाहेब भोस, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. महावीर पटवा तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात महिलांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण व्हावी आणि स्वातंत्र्यलढ्यातील वीरांगनांच्या कार्याची ओळख व्हावी, या उद्देशाने हे भित्तिपत्रक साकारण्यात आले. राणी लक्ष्मीबाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, कॅप्टन लक्ष्मी सहगल, मातंगिनी हाजरा, अरुणा आसफ अली, उषा मेहता आदी शूर महिलांच्या कार्याची माहिती आकर्षक पोस्टर्सच्या माध्यमातून सादर करण्यात आली.
या उपक्रमाचे आयोजन इतिहास विभागप्रमुख प्रा. रमेश थोरात व प्रा. डॉ. सुप्रिया पवार यांनी केले. उपक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुदाम भुजबळ, उपप्राचार्य डॉ. नितीन थोरात यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच ज्युनिअर विभागाच्या जगताप मॅडम व सीनियर विभागाच्या डॉ.
अर्चना फुलारी  यांनी सहकार्य केले.
या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading