श्रीगोंद्यात अवैध दारू विक्रीवर छापा; ४ हॉटेलचालकांवर कारवाई, ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त..

दिनांक २७ मे २०२६,श्रीगोंदा:

तालुक्यातील विविध हॉटेल्समध्ये सुरू असलेल्या अवैध देशी-विदेशी दारू विक्रीवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली बेलवंडी पोलीस स्टेशनच्या पथकाने ही कारवाई केली असून, एकूण ६२ हजार ३४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हॉटेल दोस्ती (पारगाव) येथे दत्तात्रेय बाळू बोरुडे (रा. बोरुडेवाडी) याच्याकडून ३३,९२५ रुपयांचा साठा जप्त., हॉटेल निसर्ग (आढळगाव रोड) विक्रांत संजय ससाने (रा. गांधीनगर, बोलेगाव, नगर) याच्याकडून १८,९४५ रुपयांची दारू जप्त., हॉटेल वैष्णवी (आढळगाव रोड) अविनाश अशोक खवळे (रा. आवटेवाडी, श्रीगोंदा) याच्याकडून ८,११० रुपयांचा मुद्देमाल जप्त., हॉटेल संजोग (काष्टी रोड) विशाल शामराव कळसकर याच्याकडून १,४०५ रुपयांची दारू जप्त.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या गोपनीय माहितीच्या आधारे बेलवंडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, पोलीस हवालदार संदीप गवारे, पोलीस कॉन्स्टेबल राजू भोर, विनोद पवार आणि होमगार्ड यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करीत आहेत.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading