इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोफत पूर्वतयारी प्रशिक्षण. ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन.

अहिल्यानगर, दि. १४ :

राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठीच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने महाज्योतीमार्फत जेईई, नीट आणि एमएचटी-सीईटी २०२६-२८ बॅचसाठी मोफत ऑनलाइन पूर्वतयारी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक विनोद लोंढे यांनी केले आहे.

महाज्योतीमार्फत विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने दर्जेदार प्रशिक्षण दिले जाणार असून टॅबही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या प्रशिक्षणासाठी विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. संबंधित विद्यार्थी इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा. विद्यार्थी  इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा. तसेच विद्यार्थ्याने विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थी हा नॉन क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा. विद्यार्थ्यांची निवड इयत्ता दहावीतील गुणांची टक्केवारी, सामाजिक प्रवर्ग तसेच समांतर आरक्षणानुसार करण्यात येणार आहे.

अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, रहिवासी दाखला, जातीचे प्रमाणपत्र, वैध नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, इयत्ता दहावीची गुणपत्रिका, दिव्यांग असल्यास संबंधित प्रमाणपत्र तसेच अनाथ असल्यास त्याबाबतचा दाखला सादर करणे आवश्यक राहील. विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत.

अर्जासोबत सर्व कागदपत्रे स्वसाक्षांकित करून स्पष्ट दिसतील अशा पद्धतीने स्कॅन करून जोडावीत, असेही कळविण्यात आले आहे.

स्रोत:(dio)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading