भारतीय सशस्त्र दलातील अधिकारी पदांच्या पूर्व प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांना सुवर्णसंधी.

अहिल्यानगर, दि. १४-

भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड येथे नवयुवक – नवयुवतींसाठी दि. १५ जून ते २८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. ६७ चे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, अहिल्यानगर यांनी केले आहे.

प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणासोबतच मोफत निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अहिल्यानगर येथे दिनांक ०८ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता उपस्थित राहावे.‌ उमेदवारांनी सैनिक कल्याण विभागाच्या (डीएसडब्ल्यू) अधिकृत संकेतस्थळावरून अर्जाचा नमुना व प्रवेशपत्र डाउनलोड करून आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहणे आवश्यक आहे.

या प्रशिक्षणासाठी उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक असून संघ लोकसेवा आयोग, नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या सी.डी.एस. परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज केलेला असावा. याबाबत अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्याशी training.pctcnashik@gmail.com या ई-मेलवर किंवा दूरध्वनी क्रमांक ०२५३-२४५१०३२ तसेच व्हॉट्सॲप क्रमांक ९१५६०७३३०६ वर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

स्रोत:(dio)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading