महादजी शिंदे विद्यालयाच्या १९७६ च्या एस.एस.सी. बॅचकडून शाळेला २५ हजारांची देणगी!

दिनांक ७ जुलै २०२६ श्रीगोंदा:

येथील महादजी शिंदे विद्यालयाच्या सन १९७६ मधील एस.एस.सी. (SSC) बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या स्नेहसंमेलनाचे औचित्य साधत विद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

या बॅचच्या वतीने विद्यालयाच्या शैक्षणिक व भौतिक विकासासाठी २५,००० रुपयांचा देणगी धनादेश मुख्याध्यापक भुजबळ सर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.

आपण ज्या शाळेत शिकलो, मोठे झालो, त्या शाळेचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून माजी विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबवला.

यावेळी मुख्याध्यापकांनी, माजी विद्यार्थ्यांचा हा उपक्रम चालू पिढीतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशा शब्दांत सर्व माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले.

या देणगीचा धनादेश सतीश काका बोरा यांच्या मार्गदर्शनाखाली सुपूर्त करताना माजी विद्यार्थी संघाचे प्रतिनिधी ॲड. पांडुरंग खेतमाळीस, शशिकांत आंधळकर, रामदास घोडेकर, दीपक घोडके, भास्कर नरके, तसेच ज्येष्ठ पत्रकार पीटर रणसिंग आदी मान्यवर उपस्थित होते.

स्रोत:(आयोजित कार्यक्रम)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading