महात्मा ज्योतिबा फुले स्मारकाची दुरावस्था; श्रीगोंदा नगरपालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप..

दिनांक ७ जुलै २०२६ श्रीगोंदा:

शहरातील बहुजन समाजाचे श्रद्धास्थान आणि आशास्थान असलेले क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाची सध्या मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे.

श्रीगोंदा नगरपालिका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे स्मारक परिसरात मोठ्या प्रमाणात गवत आणि झुडप उगवली असून, या पवित्र वास्तूची दुरवस्था झाल्याचे चित्र समोर आले आहे.

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजसुधारणेसाठी आपले आयुष्य वेचले. अशा थोर महापुरुषाच्या स्मारकाची योग्य ती निगा राखणे ही श्रीगोंदा नगरपालिका प्रशासनाची नैतिक आणि प्रशासकीय जबाबदारी आहे.

https://amzn.to/4f4kumY

मात्र, पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे स्मारकाच्या परिसरात गवत वाढले असून, या ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे.

या प्रकारामुळे स्थानिक नागरिक आणि समाजप्रेमींमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. श्रीगोंदा नगरपालिका प्रशासनाने तात्काळ जागे होऊन या स्मारकाची स्वच्छता करावी आणि परिसराचे सुशोभीकरण करून स्मारकाचा आदर राखावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading