दिनांक ६ जुलै २०२६,श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरातील स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या श्रीगोंदा नगरपालिकेने शहराची दुरवस्था केली आहे. पावसाळ्यापूर्वी कोणतीही आवश्यक कामे न केल्यामुळे शहरातील ठिकठिकाणी पाणी साचले असून, नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
पावसाळ्याची पूर्वतयारी करण्यात नगरपालिका पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र समोर आले आहे. शहरातील बगाडे कॉर्नर ते दिल्ली दरवाजा या दरम्यानचा रस्ता पूर्णपणे जलमय झाला आहे., बायपास रोडवर पाण्याचे मोठे डोह साचले आहेत., शहरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था तर अतिशय दयनीय झाली असून ते पूर्णपणे चिखलमय झाले आहेत.

रस्त्यांवर पडलेले खड्डे आता चिखल आणि पावसाच्या पाण्याने पूर्णपणे भरले आहेत. वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने, या रस्त्यांवर मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पालिका प्रशासनाला एखाद्या मोठ्या दुर्घटनेची प्रतीक्षा आहे का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
नागरिकांमधून व्यक्त होणाऱ्या नाराजीनुसार, नगरपालिकेच्या कारभारातील उणिवा ठळकपणे समोर येत आहेत ज्यात पावसाळा पूर्व कामांमधील नालेसफाई आणि रस्त्यांची डागडुजी पावसाळा सुरू होण्यापूर्वी करणे गरजेचे होते, परंतु पालिकेने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.

शहरातील अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांची दुरवस्था उघड्या डोळ्यांनी दिसत असतानाही पालिका प्रशासन सुस्त बसले आहे.

चिखलमय आणि पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमुळे दररोज लहान-मोठे अपघात होत असून, नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे.
शहरातील या विदारक परिस्थितीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये नगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात तीव्र संताप व नाराजी व्यक्त केली जात आहे.
स्रोत:(शहरातील सध्य परिस्थितीनुसार)
