दिनांक २४ जुलै २०२६ श्रीगोंदा:
नीट (NEET) परीक्षा पेपरफुटीच्या प्रकरणाने संपूर्ण देश ढवळून निघाला असतानाच, याविरोधात दिल्ली येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा श्रीगोंदा तालुका युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.
या प्रकरणातील दोषींवर कारवाई आणि विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी श्रीगोंदा तहसीलदारांना निवेदन दिले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत दत्तात्रय ओगले यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.
नीट पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा., दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या बळाचा वापर आणि लाठीमाराचा निषेध करून संबंधित दोषी पोलिसांवर कारवाई करावी.,देशभरात आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत.. या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रशांत ओगले म्हणाले की, “नीट पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढणाऱ्या तरुणांवर लाठीमार करणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पहावे, अन्यथा युवक काँग्रेस तीव्र आंदोलन करेल.”
या प्रसंगी श्रीगोंदा तालुका अध्यक्ष संतोष भोयटे, महिला काँग्रेस अध्यक्षा सौ. सुनीता दरवडे, अँड. समित बोरुडे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष विकास काळे, शहाजी खेडकर (चेअरमन), मुजफ्फर मालजप्ते, डॉ. गोरख बायकर, सचिन गायकवाड, संतोष बायकर, सोहेल शेख, प्रवीण ढगे, सूरज शेख, योगेश शेळके, अफ्रिद इनामदार, विलास पाटील नलगे, संतोष नलगे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
स्रोत:(आयोजित आंदोलन)
