दिनांक २० मे २०२६,श्रीगोंदा:
येथील तुळजा भवानी सेवा प्रतिष्ठान संचलित सोनिया गांधी पॉलिटेक्निकमधील इलेक्ट्रिकल विभागाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ‘सोलर पॅनल पॉवर सिस्टम’ हा अभिनव प्रकल्प यशस्वीरीत्या साकारला आहे. सौरऊर्जेवर आधारित या पर्यावरणपूरक प्रकल्पामुळे महाविद्यालयाचे वीजबिल शून्यावर आणण्यात यश आले असून, विद्यार्थ्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वाढत्या वीजदरांना सक्षम पर्याय म्हणून विद्यार्थ्यांनी या प्रकल्पाद्वारे सौरऊर्जेपासून वीजनिर्मिती केली व त्यावर महाविद्यालयातील विविध उपकरणे कार्यान्वित करून दाखवली. ग्रामीण भागात ऊर्जा बचतीचा संदेश देणारा हा प्रकल्प अत्यंत दिशादर्शक ठरत आहे.
या यशासाठी विद्यार्थ्यांना प्राचार्य अमोल नागवडे, विभागप्रमुख प्रविण बाबर व इलेक्ट्रिकल विभागातील प्राध्यापकांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या कल्पकतेची दखल घेत संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे आणि अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधाताई नागवडे यांनी प्रकल्पाला भेट देऊन विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले व हा उपक्रम भविष्यासाठी प्रेरणादायी असल्याचे म्हटले.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
















Leave a Reply