दिनांक १० ऑगस्ट २०२६, श्रीगोंदा:
तालुक्यातील उक्कडगाव येथील गट क्रमांक ४३ मधील ऊसाच्या शेतात शेतकरी दशरथ सोपान गोलांडे (वय ६९ वर्षे) हे आपल्या ऊसाच्या शेतात गवत काढणीचे काम करत असताना, त्यांना शेतामध्ये एका अनोळखी पुरुष व्यक्तीचा मानवी सांगाडा दिसून आला. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती बेलवंडी पोलीस ठाण्याला दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. सदरचा मानवी सांगाडा तीन ते चार महिने पूर्वी चा असण्याची शक्यता आहे.
सदर प्रकरणाचा पुढील अधिक तपास प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार जावेद शेख हे करत आहेत.
मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे चालू आहे. सदर सांगाड्या मध्ये एक फुल बाहिचा आकासी रंगाचा शर्ट, विटकरी रंगाची अंडरवेअर व पांढरे बनियन तसेच शेजारी वीटकरी रंगाची चप्पल मिळून आलेली आहे. तरी सदर बाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास **९८९०३२७०७२** किंवा **८८५७८८२२५५** या क्रमांकांवर बेलवंडी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
