मुलीने केली आईची हज यात्रेची ईच्छा पुर्ण*

श्रीगोंदा (प्रतिनिधी):- इस्लाम मध्ये हज यात्रा करण्याची सर्वांची इच्छा असते पण प्रारब्ध शिवाय ती पूर्ण होत नाही अहिल्या नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील हाफिज रियाज खान आणि त्यांची दिवंगत पत्नी शकिला खान यांची हज यात्रा करण्याची ईच्छा होती पण दुर्दैवाने शकिला खान यांचे आजारात निधन झाले तिची हज यात्रा करण्याची ईच्छा पुर्ण करण्याचे त्यांची मुलगी श्रीगोंदा येथील पत्रकार मुश्ताक पठाण यांच्या पत्नी सौ. सलमा मुश्ताक पठाण यांनी पूर्ण करण्याचे ठरवले याला दुसऱ्याच्या वतीने यात्रा अर्थात हज्जे बदल म्हणतात स्वतः सौ.सलमा यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेह असताना त्यांनी दिवंगत आईची ईच्छा पुर्ण करण्याचे ठरवले आणि तिचे वडिल हाफिज रियाज खान यांच्या बरोबर मक्का मदिना येथे ४५ दिवसाच्या कालावधीत तेथील उन्हाचा पारा वाढता असताना हज यात्रा पूर्ण करून त्या मायदेशी परतल्या.२४ एप्रिल ते ९ जून या ४५ दिवसात त्यांनी मदिना,मक्का आणि हजच्या मीना येथील वास्तव्यात यात्रा पूर्ण केली .श्रीगोंदा येथील अकील मुस्तफा कुरेशी,सौ. अमीना अकील कुरेशी तसेच मुख्तार युसुफ शेख आणि सौ. इशरत मुख्तार शेख हे ४ जण देखील हज यात्रा पूर्ण करून मायदेशी परतले.
*चौकट*
हज यात्रेसाठी जाणे होईल असे वाटत नव्हते पण प्रारब्धात होते आईची ईच्छा पुर्ण करण्याची जिद्द तेथील हवामानात दैवी कृपेने पार पडले आईने हज यात्रा हयातीत केली असती तर निश्चितच आनंदच झाला असता पण तिच्या वतीने हज यात्रा केली आईसाठी काही केल याचे वेगळे समाधान आहे. मला उच्च रक्तदाब आणि मधुमेह आहे पण अहिल्या नगर येथील न्युक्लिअस हॉस्पिटल चे संचालक डॉ. गोपाळ बहुरूपी यांच्या सल्ल्याने उपचार घेऊन दोन्ही व्याधीवर नियंत्रण मिळवून यात्रा पार पडली – हज्जन सौ.सलमा मुश्ताक पठाण

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading