श्रीगोंदा – काष्टी – मांडवगण फराटा बस सेवा अखेर सुरू!.. संभाजी ब्रिगेडच्या पाठपुराव्याला मिळाले यश..

श्रीगोंदा (३१ जुलै २०२५) –

संभाजी ब्रिगेडच्या सातत्यपूर्ण मागणीला यश मिळवत अखेर श्रीगोंदा – काष्टी – मांडवगण फराटा बस सेवा आजपासून सुरू करण्यात आली.

काष्टी येथे सकाळी ८ वाजता या सेवेचे उद्घाटन तालुकाध्यक्ष इंजि. शामभाऊ जरे यांच्या हस्ते झाले. जिल्हाध्यक्ष दिलीप वाळुंज, संजय सोनवणे, दिलीप लबडे, सुयोग धस आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रफुल्ल उर्फ बापू जगताप व पांडुरंग खोरे यांच्या पाठपुराव्यामुळे सेवा शक्य झाली. आगारप्रमुख संदीप ढवळे साहेब यांनीही सेवेस मंजुरी मिळाल्याचे स्पष्ट केले. बससेवा सुरू झाल्याने प्रवासी, विद्यार्थी व शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Advertise…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading