दिनांक २३ एप्रिल २०२५,संभाजीनगर/श्रीगोंदा:
दिनांक २३ एप्रिल २०२५ रोजी संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्याचे दिव्यांग मंत्रालयाचे मंत्री व संघटनेचे अध्यक्ष मा. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे औचित्य होते ‘धनश्री संताजी पुरस्कार सोहळा’, ज्यामध्ये दिव्यांग कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच, त्यांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी चर्चा झाली.

या कार्यक्रमात प्रहार दिव्यांग संघटना श्रीगोंदा तालुक्याचे अध्यक्ष राजेंद्र पोकळे यांनी मा. बच्चू कडू साहेब यांचा खास सन्मान करत त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली. हा क्षण उपस्थित कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरला.

कार्यक्रमाला विविध मान्यवर उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पोकळे, राज्य कार्यकारिणी सदस्य लक्ष्मी देशमुख, राजेंद्र पोकळे, सुरेश गलांडे, दीपचंद वायदंडे, डॉ. सोमनाथ देवकाते, सचिन तोडकर, सिराज भाई शेख, बाबासाहेब घोडके, नंदकुमार पोटे, वैभव हराळ, गणेश कळसकर, परेश वाबळे यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली.

कार्यक्रमात दिव्यांग कार्यकर्त्यांच्या विविध समस्या, शासकीय योजनांची अंमलबजावणी, स्थानिक पातळीवरील सुविधा यावर सखोल चर्चा झाली. मा. बच्चू कडू साहेबांनी उपस्थितांचे मुद्दे गांभीर्याने ऐकून घेतले आणि त्यावर तातडीने कार्यवाहीचे आश्वासन दिले.

हा सोहळा फक्त पुरस्कार वितरणापुरता मर्यादित न राहता, तो एक सकारात्मक संवाद आणि सशक्तीकरणाचा मंच ठरला. दिव्यांग बांधवांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन समाजहिताचे निर्धार व्यक्त केले.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
