श्रीगोंदा, दिनांक २४ एप्रिल २०२५:
जागतिक हिवताप दिनाचे औचित्य साधून ग्रामीण रुग्णालय, श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २५ एप्रिल २०२५ रोजी हिवतापाविषयी जनजागृतीसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये हिवतापासह चिकनगुनिया आणि डेंगू या साथीच्या आजारांविषयी जनजागृती करणे हा आहे.

या कार्यक्रमांतर्गत हिवताप विषयक माहितीपत्रके (हस्तपत्रिका) वाटप, तसेच शालेय विद्यार्थ्यांना व अंगणवाडीतील बालकांना हिवतापाविषयी माहिती देणे असे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. नागरिकांना हिवताप, चिकनगुनिया व डेंगू हे आजार कशामुळे पसरतात आणि त्यावर कोणत्या उपाययोजना कराव्यात, याविषयी सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

या कार्यक्रमात जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रविंद्र कानडे सर, तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आकाश कोकरे सर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. विशेष बाब म्हणजे, या दिवशी ग्रामीण रुग्णालय, श्रीगोंदा येथे हिवतापाची मोफत चाचणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या जनजागृती कार्यक्रमाचे घोषवाक्य आहे:
“चला हिवतापाला संपवूया, पुन्हा योगदान द्या, पुनर्विचार करा, पुन्हा सक्रिय व्हा”

या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी श्रीगोंदा शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामीण रुग्णालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

स्रोत: प्रसिद्धी पत्र

Advertise…
