दिनांक २ एप्रिल २०२५, श्रीगोंदा:
श्रीगोंदा येथील रेणुका माता मंदिरासमोर वास्तव्यास असलेले मदन बिसुकर्मा (वय ४१) गेल्या ६-७ वर्षांपासून किडनी फेल्युअर या गंभीर आजाराने त्रस्त आहेत. सततच्या डायलिसिसच्या खर्चामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. कोविड काळातही त्यांनी नगर येथे आठवड्यातून दोन वेळा डायलिसिससाठी मोठ्या संघर्षाने ये-जा केली.
सध्या छत्रपती संभाजीनगर येथील सिग्मा हॉस्पिटलमध्ये त्यांना किडनी प्रत्यारोपणासाठी दाता मिळाला आहे. मात्र, प्रत्यारोपणासाठी सुमारे ६.५० ते ७.५० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
त्यांच्या या संघर्षमय प्रवासात आपण सर्वांनी मिळून मदतीचा हात द्यावा, ही विनम्र विनंती. आपण आपल्या परीने आर्थिक मदत करून त्यांच्या आयुष्याला नव्याने संजीवनी देऊ शकतो.
मदतीसाठी संपर्क:
✅ PhonePe / Google Pay: 99756 18444
✅ अधिक माहितीसाठी संपर्क:
📞 सतीश बोरा – 9422223700
📞 प्रा. बाळासाहेब बळेसर – 9421936171
📞 अभिषेक दंडनाईक – 9096829339 (श्रीगोंदा)
“आपली छोटीशी मदत मदन बिसुकर्मा यांच्या आयुष्यात मोठा फरक करू शकते!”
स्रोत:(वैद्यकीय मदतीसाठी)





Advertise..
