दिनांक ५ मे २०२६,श्रीगोंदा:
माणसाचं आयुष्य किती अनिश्चित असतं, याचा प्रत्यय श्रीगोंद्यातील संदीप बजरंग घोडके यांच्याकडे पाहिल्यावर येतो. वयाची अवघी चाळीशी… पदरात दोन लहान मुली, एक मुलगा आणि पत्नी. हसतं-खेळतं कुटुंब, पण २०२३ पासून या कुटुंबाला नियतीची नजर लागली. संदीप यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आणि तिथून सुरू झाला एक भीषण संघर्ष.

संदीप हे कुटुंबाचा एकमेव आधार आहेत. शरीर आजाराने पोखरलेलं असतानाही, “माझ्या मुलांनी उपाशी राहू नये,” या जिद्दीने ते आजही काम करत आहेत. पण आता आजार बळावला आहे. डॉक्टरांनी किडनी बदलण्याचा (प्रत्यारोपण) सल्ला दिला. २४ एप्रिल २०२६ ही शस्त्रक्रियेची तारीखही ठरली होती, पण दुर्दैव असं की, शस्त्रक्रियेसाठी लागणारा लाखो रुपयांचा निधी उभा राहू शकला नाही आणि छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयातून त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
माध्यमांशी बोलताना संदीप यांना अश्रू अनावर झाले. ते म्हणाले, “मला मरायची भीती वाटत नाही, पण माझ्यामागे माझ्या लहान मुलांचं काय होईल? त्यांच्या शिक्षणाचं, त्यांच्या संगोपनाचं काय? मी या कुटुंबाचा आधार आहे, पण आज मीच हतबल झालोय.” संदीप यांचा हा प्रश्न आज समाजातील प्रत्येक संवेदनशील माणसाला विचार करायला लावणारा आहे.
संदीप यांच्या काही मित्रांनी आणि सामाजिक संघटनांनी मदतीचा प्रयत्न केला, पण शस्त्रक्रियेचा खर्च डोंगराएवढा आहे. श्रीगोंदा तालुका हा नेहमीच माणुसकी जपण्यासाठी ओळखला जातो. येथील दानशूर व्यापारी, सामाजिक संस्था आणि प्रत्येक नागरिकाला कळकळीची विनंती आहे की, ‘एक हात मदतीचा’ पुढे करा. तुमच्या खिशातील काही रुपये या कुटुंबाचा ‘संसार’ वाचवू शकतात आणि त्या तीन चिमुरड्यांच्या डोक्यावरचा ‘बापाचा हात’ कायम राखू शकतात.
मदत करण्यासाठी बँक तपशील:
आपण आपली मदत थेट संदीप यांच्या खात्यावर पाठवू शकता:
- बँकेचे नाव: भारतीय स्टेट बँक (State Bank of India)
- नाव: श्री. संदीप बजरंग घोडके (Mr. SANDIP BAJRANG GHODAKE)
- खाते क्रमांक: 34467623807
- IFSC कोड: SBIN0000295
तुमचा एक छोटासा वाटा, संदीपला देऊ शकतो नवा जन्म! कृपया हा संदेश आणि बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा..

















Leave a Reply