वैद्यकीय क्षेत्रात खळबळ: अवयव तस्करी.. मृतदेहाची परस्पर विल्हेवाट.? अहिल्यानगरमधील ५ डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांवर  गंभीर गुन्हे दाखल..!

दिनांक १९ ऑक्टोबर २०२५, अहिल्यानगर

शहरातील एका ७९ वर्षीय रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार, पाच नामांकित डॉक्टरांसह एका अनोळखी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

२०२० मध्ये बबनराव खोकराळे (वय ७९) यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.

  • डॉक्टरांनी त्यांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा खोटा अहवाल बनवला आणि चुकीचे उपचार केले, ज्यात त्यांचा मृत्यू झाला.
  • रुग्णाचा मृतदेह आजपर्यंत सापडला नाही. पुरावा नष्ट करण्यासाठी आणि अवयव तस्करीच्या उद्देशाने मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा गंभीर आरोप फिर्यादी अशोक खोकराळे यांनी केला आहे.
  • रुग्णाला बेडला बांधून ठेवणे, धमकावणे आणि एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार दाखवून बिले उकळणे. असे आरोप करण्यात आले.
  • जिल्हा शल्यचिकित्सकांनी नेमलेल्या समितीनेही डॉक्टरांनी “गैरव्यवहार, निष्काळजीपणा, आणि हलगर्जीपणा” केल्याचा अहवाल दिला आहे.
  • न्यूक्लिअस हॉस्पिटलचे डॉ. गोपाळ बहुरुपी, डॉ. सुधीर बोरकर, डॉ. सचिन पांडुळे, डॉ. अक्षयदीप झावरे, डॉ. मुकुंद तांदळे आणि डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल लॅबचे तज्ञ डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कटकारस्थान, फसवणूक, आणि मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
  • या प्रकरणाने अहिल्यानगरसह राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. फिर्यादी अशोक खोकराळे गेली पाच वर्षे या प्रकरणाचा पाठपुरावा करत होते.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Advertise…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading