अहिल्यानगर जिल्ह्यात एलसीबीचे मोठे छापे; सुपा आणि श्रीगोंद्यातून सुमारे ५० हजारांचा अवैध गुटखा जप्त, ५ जणांवर गुन्हे दाखल..

दिनांक १ सप्टेंबर २०२६, श्रीगोंदा/अहिल्यानगर:

जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या कडक आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई सुरू केली आहे. सुपा आणि श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटखा आणि सुगंधित तंबाखूच्या अवैध विक्रीवर तीन ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी एकूण ४९,९३६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या कारवाईत ५ आरोपींविरुद्ध ३ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि कृष्णकुमार सेदवाड आणि पोलीस अंमलदारांच्या दोन पथकांनी ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी ही गुप्त कारवाई केली.

सुपा पोलीस ठाणे येथील पहिली कारवाई ही बीएनएस कायदा कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल (गु.र.नं. २९८/२०२६). या कारवाईत २०,८८६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी गणेश किसन गवळी (वय ३३, रा. अपधुर, ता. पारनेर) याला ताब्यात घेण्यात आले असून, स्वप्निल साबळे (रा. रुई छत्रपती, ता. पारनेर) हा फरार आहे.
सुपा पोलीस ठाणे हद्दीत दुसरी कारवाई करण्यात आली. बीएनएस कायदा कलम १२३, २२३, २७४, २७५ अंतर्गत गुन्हा दाखल (गु.र.नं. २९९/२०२६).

या ठिकाणाहून १६,७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत आरोपी एजाज निजाम तांबोळी (वय २१, रा. बँक कॉलनी, सुपा) याच्यावर कारवाई करण्यात आली.

श्रीगोंदा पोलीस ठाणे हद्दीत तिसरी कारवाई बीएनएस कायदा कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल (गु.र.नं. ७८५/२०२६). पोलिसांनी १२,३२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. यात प्रवीण सतीश गायकवाड (रा. लोणी व्यंकनाथ, ता. श्रीगोंदा) याच्यावर कारवाई करण्यात आली असून, यश दळवी (रा. श्रीगोंदा) हा फरार झाला आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार एलसीबीचे अधिकारी आणि अंमलदार अतुल लोटके, भिमराज खर्से, अमोल आजबे, प्रकाश मांडगे, किशोर शिरसाठ, अरुण मोरे, बिरप्पा करमल, राहुल द्वारके, शामसुंदर जाधव, अमोल कोतकर, प्रताप देवकाते, योगेश कर्डीले आणि भगवान धुळे यांच्या पथकाने केली आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading