आनंदऋषीजी नेत्रालय व संत शिरोमणी शेख महंमद महाराज प्रतिष्ठानचा उपक्रम यशस्वी..

दिनांक १६ एप्रिल २०२५, आष्टी:

तालुक्यातील श्रीक्षेत्र वाहिरा येथे श्री संत शिरोमणी शेख महंमद महाराज प्रतिष्ठान आणि आनंदऋषीजी नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. १३ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात आलेल्या या शिबिरात ४० रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली.

तपासणीअंती १५ रुग्णांमध्ये मोतीबिंदू आढळून आला असून, त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमनाथ शेलार सर यांनी केले. तर उपस्थित मान्यवरांचे व सर्वांच्या सहकार्याबद्दल आभार सदाशिव पगारे सर यांनी मानले.

या उपक्रमावेळी संत शिरोमणी शेख महंमद महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष ह.भ.प. सिध्दीनाथ मेटे महाराज, सोमनाथ मेटे महाराज, समाधान महाराज नाडकर तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमात आनंदऋषी हॉस्पिटलचे किरण कवडे, डॉ. अशोक महाडिक, प्रशासकीय अधिकारी आनंद छाजेड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा सामाजिक उपक्रम यशस्वी झाला, अशी माहिती सिध्दीनाथ मेटे महाराज यांनी दिली. गावातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

स्रोत:(पत्रकार समाधान महाराज नाडकर)

Advertise..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading