डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाविद्यालयात १८ तास अभ्यास अभियान संपन्न..

दिनांक १६ एप्रिल २०२५, श्रीगोंदा, अहमदनगर: 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी कल्याण मंडळ व ग्रंथालय विभागाच्या संयुक्त विद्यमाने १८ तास अभ्यास अभियान राबवण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी सर्वांनी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केले.

या प्रसंगी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मनोहर सूर्यवंशी यांनी ‘डॉ. आंबेडकरांची अभ्यासावरील श्रद्धा’ या विषयावर मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य केवळ संविधानापुरते मर्यादित नसून भारतीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी योगदान दिले आहे. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, मेहनत आणि शिक्षणाची जिद्द विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. सार्वजनिक लाईटच्या प्रकाशात बसून १८-१८ तास अभ्यास करून त्यांनी उत्तुंग व्यक्तिमत्व घडवले.”

यानंतर राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शिवाजीराव नेटके यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्व समजावले.

प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. मिलिंद बेडसे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संदीप अभंग यांनी प्रास्ताविक केले तर प्रभारी ग्रंथपाल ईश्वर कणसे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अनिल पवार, अनिल बोरुडे, सोमनाथ सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

या अभिनव उपक्रमाबद्दल संस्थाध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, विश्वस्त प्रा. सुरेश रसाळ, संस्था निरीक्षक सचिनराव लगड, उपप्राचार्य चंद्रकांत कातोरे, पर्यवेक्षक प्रवीण टकले तसेच महाविद्यालयातील सर्व अध्यापक व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading