श्रीगोंदा, दि. १३ जून २०२५ –
श्रीगोंदा तालुक्यातील चोऱाची वाडी येथील दिव्यांग विद्यार्थिनी संस्कृती काळे हिला शाळेत जाण्यासाठी येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आज श्रीगोंदा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने मोफत सायकल प्रदान करण्यात आली.

ही सायकल प्राथमिक शाळेच्या शिक्षिका मॅडम यांच्या विशेष प्रयत्नातून उपलब्ध झाली असून, त्यामुळे संस्कृतीला घरून शाळेपर्यंत पोहोचणे आता सोयीचे होणार आहे.

या सायकल वाटप कार्यक्रमास सरपंच संतोष शिंदे, प्रहार दिव्यांग संघटनेचे श्रीगोंदा अध्यक्ष राजेंद्र पोकळे, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव बनसोडे, दीपचंद वायदंडे, सुरेश गलांडे, सिराज शेख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने शासन व प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. तसेच, संस्कृतीच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

शिक्षणासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना आधार देण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी असून, इतर विद्यार्थ्यांनाही सकारात्मक उर्जा देणारा आहे. श्रीगोंदा पंचायत समिती, स्थानिक शाळा प्रशासन आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन केलेली ही कृती कौतुकास्पद आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
