दिनांक ९ एप्रिल २०२५,मुंबई/श्रीगोंदा:
आज मुंबई येथे महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या २१ मागण्यांपैकी १९ मागण्या मंजूर करण्यात आल्या. या ऐतिहासिक निर्णयानंतर दिव्यांग समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या निर्णयप्रक्रियेसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार, सर्व विभागांचे सचिव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी दिव्यांगांच्या हितासाठी लढा देणाऱ्या प्रहार अपंग संघटनेच्या वतीने राजेंद्र पोकळे (अहमदनगर जिल्हाध्यक्ष) यांनी राज्याचे अपंग कल्याण मंत्री मा. बच्चू कडू यांचा विशेष सन्मान केला. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि शाल भेट देऊन गौरवण्यात आले.

कार्यक्रमास प्रहार दिव्यांग संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य सौ. लक्ष्मीताई देशमुख, संतोष पवार, विनोद भाऊ परदेशी, सोमनाथ देवकाते, सचिन तोडकर यांच्यासह विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या निर्णयामुळे दिव्यांग बांधवांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला असून, सरकारकडून यावर तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, अशी अपेक्षा संघटनेकडून व्यक्त करण्यात आली आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
