दिनांक ८ एप्रिल २०२५, श्रीगोंदा:
श्री संत शेख महंमद महाराज यांच्या पावन भूमीवर, श्रीगोंदा तालुक्यातील अहिल्यानगर येथे एक भव्य आणि निःशुल्क योग व प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर दिनांक १० एप्रिल २०२५ पासून १४ एप्रिल २०२५ पर्यंत दररोज पहाटे ५:३० ते सकाळी ७:३० या वेळेत होणार आहे.

या शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे येथील ५ अनुभवी योगगुरूंच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास व प्राणायामाचे सत्र घेतले जाणार आहे. त्यामुळे सर्व वयोगटातील नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक हरिओम योग ग्रुप, श्रीगोंदा यांनी केले आहे.

शिबिरासाठी आवश्यक जागा तुळशीदास उद्योग समूहाचे मा. श्री प्रशांतदादा गोरे व गोरे परिवार यांनी त्यांच्या मंगल कार्यालयाचा विना मोबदला उपयोग करून दिला आहे. त्यांच्या या उदार योगदानामुळेच हे शिबीर भव्य स्वरूपात राबवणे शक्य झाले आहे.

योग आणि प्राणायाम हे आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत आहेत. त्यामुळे श्रीगोंदा परिसरातील नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन आरोग्यदायी जीवनशैलीकडे पाऊल टाकावे, असेही हरिओम योग ग्रुपतर्फे नम्र आवाहन करण्यात आले आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Advertise..
