नवीन कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन..

दिनांक ११ जुलै २०२४, श्रीगोंदा:

तालुका विधी सेवा समिती श्रीगोंदा आणि पोलीस उप विभागीय कार्यालय कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय दंड सहिता २०२३, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३, आणि भारतीय साक्ष अधिनियम २०२३ यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून मा. मुजीब शेख, (जिल्हा व सत्र न्यायाधीश १, श्रीगोंदा); मा. जी. एम. साधले, (अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, श्रीगोंदा); आणि अतिरिक्तमुख अधिकारी, श्रीगोंदा उपस्थित असणार आहेत.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून मा. डी. पी. शिंगाडे, (जिल्हा न्यायाधीश दोन, श्रीगोंदा); मा. एस. पी. केकान, (दिवाणी न्यायाधीश व स्तर, श्रीगोंदा); मा. विवेकानंद वाखारे, (उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग); आणि मा. ज्ञानेश्वर भोसले, (पोलीस निरीक्षक, श्रीगोंदा पोलीस स्टेशन) उपस्थित राहणार आहेत.

मार्गदर्शन शिबिर उद्या, शुक्रवार दिनांक १२ जुलै २०२४ रोजी सकाळी ९:०० वाजता छत्रपती संभाजी महाराज सभागृह, पंचायत समिती, श्रीगोंदा येथे आयोजित करण्यात आले आहे.

स्त्रोत:(प्रसिद्धी पत्र)

जाहिरात…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading