श्रीगोंदा येथे नवीन कायदे विषयी मार्गदर्शन शिबीर संपन्न..

दिनांक १२ जुलै २०२४,श्रीगोंदा:

तालुका विधी सेवा समिती श्रीगोंदा व पोलीस उपविभागीय कार्यालय कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने आज शुक्रवार दिनांक १२ जुलै रोजी छत्रपती संभाजी महाराज सभागृह, पंचायत समिती श्रीगोंदा येथे नवीन कायदे विषयी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश -१ मुजीब शेख हे होते.

या कार्यक्रमामध्ये भारतीय न्याय संहिता -२०२३, भारतीय नागरी सुरक्षा संहिता -२०२३, भारतीय साक्ष अधिनियम -२०२३ या नवीन कायद्यांबाबत माहिती देण्यात आली तसेच इतरही कायदे विषयक मार्गदर्शन करण्यात आले. कायद्यातील नियमानुसार पोलिसांनी कशी कार्यवाही करावी याबद्दल माहिती देण्यात आली. पोलीस तपासातील समस्यांवर कायदे विषय सखोल माहिती व बारकावे यावर प्रकाश टाकण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते मा.जिल्हा व सत्र न्यायाधीश -१ मुजीब शेख, मा.अतिरिक्त मुख्य न्यायदांडाधिकारी जी. एम. साधले, मा.अतिरिक्त मुख्य न्यायदांडाधिकारी एच. जे. पठाण यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले. पोलीस अधिकाऱ्यांच्या शंकांचे निरसन यावेळी करण्यात आले. प्रश्नोत्तराद्वारे विविध विषयांवर चर्चा झाली.

या कार्यक्रमासाठी मा.जिल्हा न्यायाधीश डी. पी. शिंगाडे, मा.दिवाणी न्यायाधीश व स्तर एस. पी. केकाण, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग विवेकानंद वाखारे, श्रीगोंदा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. पोलीस उपविभागीय कार्यालय, कर्जत यांच्या कार्यक्षेत्रातील पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ताजी जगताप यांनी केले.

स्रोत:(आयोजित कार्यक्रम)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading