दिनांक १२ जुलै २०२४, श्रीगोंदा:
श्रीगोंदा पोलीस प्रशासनाच्या कोणत्याही प्रकरणातील संथ गतीची कारवाई पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण करीत आहे. श्रीगोंदा शहरासह तालुक्यात संशयित रित्या घिरट्या घालणारे ड्रोन, वाढलेल्या चोऱ्या, महाविद्यालय कार्यक्षेत्रात होणाऱ्या हाणामाऱ्या, विद्यार्थ्यांमधील दहशत, आणि पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या शांततेचा सवाल आता तालुक्यात विचारला जाऊ लागलेला आहे.
शहरामध्ये वाढत चाललेले अवैध धंदे आणि त्यांच्या वसुली कार्यात गर्क असलेली पोलीस यंत्रणा या गंभीर गोष्टींकडे दुर्लक्ष करीत असल्याचा अनेकांकडून आरोप होत आहे. दोन दिवसांपूर्वी श्रीगोंदा पोलीस स्टेशन परिसरात अगदी ठाणे अंमलदार समोर आदिवासी समाजाच्या दोन गटात तुफान हाणामारी झाली. मात्र, श्रीगोंदा पोलीस यंत्रणा त्यांना आवरण्यात हातबल ठरली..?
श्रीगोंदा परिसरातील कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये झालेला वाद विकोपाला जात चाकू व गजाने मारहाण झाली. शेकडो विद्यार्थी कॉलेज परिसरात येऊन घटनेचा निषेध करून गेले. परंतु , श्रीगोंदा पोलीस या प्रकरणी विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करू शकली नाही. त्यातच आज दुपारी श्रीगोंदा कारखाना व शहरातील दोन गटात किरकोळ कारणावरून जबरी हाणामारी झाली. यात गज, काठ्या, दगड, आणि धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. शहरातील एका कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळच हा नंगानाच झाल्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
श्रीगोंदा बस स्थानकावर काल एका विक्षिप्त युवकाने धिंगाणा घालत अंगातील कपडे काढून महाविद्यालयीन विद्यार्थिनी समोर अश्लील चाळे करत आरडाओरडा केला. यातही श्रीगोंदा पोलीस त्या युवकाचे काही वाकडे करू शकली नाही. तसेच आज बस स्थानक परिसरात कॉलेज सुटल्यानंतर काही तरुणांनी मोटरसायकली थेट बस स्थानकाच्या आत नेऊन धुमाकूळ घातला तरीही पोलीस शांतच.!
श्रीगोंदा शहरात वाढत चाललेल्या चोऱ्या, वाड्या वस्त्यांवर घिरट्या घालणारे ड्रोन, महाविद्यालय परिसरात होणाऱ्या हाणामाऱ्या, थेट पोलीस स्टेशन मध्ये आदिवासींचे झालेली भांडण व आज दोन गटात लाठयाकाट्या आणि धारदार शस्त्रांनी झालेले मारहाण या खुलेआम होणाऱ्या घटनांना आवरण्यात श्रीगोंदा पोलीस यंत्रणा व जबाबदार अधिकारी श्री. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले सपशेल फेल ठरत असल्याचे श्रीगोंदा शहरात बोलले जात आहे.
जर या सर्व घटनांना आवर घालण्यास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले कार्यक्षम नसतील.. तर, अशा अकार्यक्षम पोलीस अधिकाऱ्याची तात्काळ बदली करण्यात यावी असाही सूर सर्वसामान्यातून येत आहे.
स्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)






