काष्टी येथील महिलेच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून नागरिकांना आवाहन.

दिनांक ३ सप्टेंबर२०२५,अहिल्यानगर/श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी गावातील रहिवासी असल्याचे समजणाऱ्या एका वृद्ध महिलेचा मृत्यू उपचारादरम्यान सिव्हील हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे झाला असून तिच्या कुटुंबीयांबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. त्यामुळे श्रीगोंदा पोलीस स्टेशनकडून नागरिकांना मृत महिलेची ओळख पटविण्यासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राधाबाई मुरलीधर खंडारे (वय ६५ वर्षे) असे मृत महिलेचे नाव असून त्या काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील रहिवासी असल्याचे नमूद केले आहे. तथापि, दिलेल्या पत्त्यावर त्या वास्तव्यास आहेत की नाहीत याबाबत निश्चित माहिती नाही.

दि. २५ जुलै २०२५ रोजी १०८ अॅम्ब्युलन्सद्वारे डॉ. शरद राऊत यांनी त्यांना उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे दाखल केले होते. उपचार सुरू असताना ३० ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ५ वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. सदर प्रकरणी डॉ. एस. एस. शिंदे (वैद्यकीय अधिकारी, सिव्हील हॉस्पिटल, अहिल्यानगर) यांनी दिलेल्या माहितीनुसार आकस्मिक मृत्यू नोंद (आ.मृ.) क्र. ९०/२०२५ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १९४ अंतर्गत श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे नोंदविण्यात आली आहे.

महिलेच्या ओळखीबाबत किंवा नातेवाईकांबाबत काही माहिती असल्यास नागरिकांनी तातडीने श्रीगोंदा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे पोलिसांनी कळविले आहे.

📞 संपर्कासाठी महत्त्वाचे क्रमांक:

  • श्रीगोंदा पोलीस स्टेशन: ०२४८७-२२२३३३
  • स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर: ०२४१-२४१६११९
  • पो.नि. किरण शिंदे (श्रीगोंदा पोलीस स्टेशन): ८३२९००८३०२
  • तपासी अंमलदार पो.ना/१५७० जी.बी. यादव: ८८८८८३४८८२

पोलिसांनी आवाहन केले आहे की, “या महिलेचे नातेवाईक किंवा त्यांच्या ओळखीबाबत माहिती असल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा.”

स्रोत:(प्रेस नोट)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading