दिनांक ११ मे २०२६, श्रीगोंदा:
आजच्या काळात वाढदिवस म्हटलं की, मोठमोठे बॅनर, फटाके, डीजे आणि लाखोंचा अनावश्यक खर्च हे चित्र सर्वत्र पाहायला मिळतं. मात्र, सामाजिक भान जपत आणि माणुसकीचा आदर्श समाजासमोर ठेवत प्रसिद्ध उद्योजक तथा ‘उपसरपंच चहा’ चे संस्थापक अध्यक्ष श्री. मिलिंदशेठ भोईटे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवला.
किडनी विकाराने गंभीर आजाराशी झुंज देत असलेल्या संदीप बजरंग घोडके यांच्या कुटुंबाला मिलिंदशेठ भोईटे यांनी तब्बल १ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करून प्रत्यक्ष दिली.
संदीप घोडके यांची दोन्ही किडन्या निकामी झाल्याने त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची वेळ आली आहे. घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती, पदरात दोन लहान मुली आणि एक मुलगा… अशा कठीण प्रसंगात संदीप यांचे कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे. त्यांच्या उपचारासाठी लाखो रुपयांची गरज असताना, समाजातील विविध स्तरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळत मिलिंदशेठ भोईटे यांनी सामाजिक बांधिलकी जपत थेट मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या या कृतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
यावेळी बोलताना मिलिंदशेठ भोईटे म्हणाले, “वाढदिवस हा केवळ जल्लोष करण्यासाठी नसतो, तर समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून एखाद्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठीही असतो. संदीप घोडके यांच्यावर आलेल्या संकटात आपण सर्वांनी माणुसकीच्या नात्याने उभं राहणं गरजेचं आहे.”
संकट काळात एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी माणुसकी आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. दु:खाच्या डोंगराखाली दबलेल्या पीडित संदीप घोडके कुटुंबाला मदतीचा हात देण्यासाठी ‘उपसरपंच चहा’चे संस्थापक अध्यक्ष मिलिंदशेठ भोईटे धावून आले आहेत. त्यांनी या कुटुंबाला १ लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द करून एक आदर्श सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांच्या या मदतीमुळे संदीप घोडके यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून, समाजातही एक सकारात्मक संदेश गेला आहे.
स्रोत:(अधिकृत माहिती)
