साजन पाचपुते यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन: खा. संजय राऊत यांचे उपस्थितीत मोठा कार्यक्रम..
दिनांक १३ जुलै २०२४, श्रीगोंदा:
आज श्रीगोंदा तालुक्यातील लोकांसाठी काम करणारे स्वर्गीय सदाआण्णा पाचपुते यांचा वारसा पुढे घेऊन जाणारे साजन पाचपुते यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. राज्यसभेचे खासदार श्री संजय राऊत यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या कार्यक्रमाला सुनील शिंदे, संदेश कार्ले, राणीताई लंके, रवींद्र भगत, योगीराज गाडे, वसंत मोरे, भगवान फुलसौंदर, संभाजी कदम, शरद झोडगे, भाऊसाहेब गोरे, विजय शेंडे, संतोष खेतमाळीस, एम डी शिंदे, अरविंद कापसे, जयराज गोरे, शिवाजी राऊत, सुभान तांबोळी, टिळक भोस, रमेश कटारिया, किरण काळे, मनोज गुगळे, अजित चुडीवाल, नाना दुतारे, सुरेश देशमुख, निलेश साळुंखे, ऋषिकेश गोरे, नितीन शिंदे, इत्यादी मान्यवरांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संदेश कार्ले होते. विजय शेंडे यांनी प्रास्ताविकात तालुक्यातील शिवसेनेची पार्श्वभूमी, स्थापना आणि सद्यस्थितीबद्दल माहिती दिली. त्यांनी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे मूलभूत प्रश्न मांडले व त्यातून मार्ग काढण्याची अपेक्षा संजय राऊत यांच्याकडून व्यक्त केली.
उपस्थित मान्यवरांचे बेलवंडी बुद्रुक गावचे सरपंच ऋषिकेश शेलार यांनी स्वागत केले, तर दत्ता पाचपुते यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. उपस्थित मान्यवरांत संजय राऊत, वसंत तात्या मोरे, भगवान फुलसौंदर, राजेंद्र भगत, शरद झोडगे, संदेश कार्ले, किरण काळे, राणीताई लंके, आणि प्रतिमा गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला.
संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलेल्या या कार्यक्रमात दत्तात्रय खोटे, बांगर्डे गावचे सरपंच व कार्यकर्ते अतुल कंद, गणेश इथापे, गजानन तांडेल, जहीर जकाते, बबन सय्यद, दस्तगीर इनामदार, सतीश शेंडगे, फिरोज शेख, समीर दहातोंडे, यशराज जाधव, महेश चव्हाण, ऋतिक कुंडकर, अर्जुन सोनटक्के, रोहन निकम, सलमान शेख, सुरज डाडर, अनंत पवार, आनिस नलगे, मुंगूसगाव येथील सागर माहुरकर, (सरपंच), सुनील इथापे, महेश जाधव, परेश जाधव, ॲड.गाजरे, इत्यादी सह विविध पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
वसंत तात्या मोरे यांनी साजन पाचपुते यांच्या आगामी आमदार पदासाठी संजय राऊत व उपस्थितांसमोर आपली अपेक्षा व्यक्त केली. संदेश कार्ले यांनीही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची भूमिका स्पष्ट केली आणि सर्वसामान्य माणूस व शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी साजन पाचपुते यांनी पुढाकार घेतल्याचे नमूद केले.
उपनेते साजन पाचपुते यांनी या जनसभेत स्पष्टपणे सांगितले की ते सहा महिन्यांपूर्वी शिवसेना संघटनेत सक्रिय झाले आहेत. त्यांची आमदार होण्याची तीव्र इच्छा आहे आणि सामान्य लोकांसाठी काम करण्याचा दृढनिश्चय आहे. पाचपुते यांनी सांगितले की, तालुक्यातील प्रश्न गंभीर होत चालले आहेत. आढळगाव सारख्या गावात मुलांना शाळेत जायला रस्ता नाही, तालुक्याने पाचपुते सोडून कधी मतदान केलेले नाही. “मला एकदा आमदार करा, मी सगळं ठीक ठाक करतो.”
श्रीगोंद्यात मागील आठ दिवस लाईट नव्हती. अधिकाऱ्यांना विचारणार कोण.? पोलिस ठाण्याची परिस्थितीही अत्यंत गंभीर आहे; साध्या केससाठी सामान्य माणसांना वीस हजार रुपये मोजावे लागतात. प्रशासनावर कोणाचाही दबाव नाही आणि पाचपुते म्हणाले की, “मी चांगला असलो तर प्रक्रियेत काम करू शकतो. एकदा माझ्यावर विश्वास ठेवा, मी गुलाल आणून दाखवीन.”
साजन पाचपुते यांनी लोकांना आवाहन केले की, काम करत असताना कोण आपले आणि कोण परके..? हे ओळखायला शिका. कामात दहा टक्क्यांची अपेक्षा ठेवणाऱ्यांना काय बोलावे..? असा खोचच सवाल त्यांनी उपस्थित केला. २०१९ मध्ये विखेंना निवडून आणण्यात सदाअण्णांचा मोलाचा वाटा होता, असेही त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले, “लोकांनी निवडणूक हातात घेतल्यास क्रांती घडते. मला लोकांसाठी काम करायचे आहे. वडिलांनी दिलेला संदेश आठवतो, ‘पैसे, कारखाने, बंगले येथेच राहतील.’ हे अण्णांचे बोल त्यांनी उपस्थितांना सांगीतले..”
शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी श्रीगोंदा तालुक्यातील सामाजिक राजकीय परिस्थितीवर चर्चा केली आणि साजन पाचपुते यांच्या प्रामाणिक कार्याचे कौतुक केले. त्यांनी नकली पाचपुते बाजूला करून असली पाचपुते आमदार करणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी वडवकर वस्ती आढळगाव येथील रस्त्याच्या कामासाठी साजन पाचपुते यांनी ५० हजार रुपयांचा धनादेश नागरिकांना सुपूर्त केला. या कार्यक्रमात सहभागी पदाधिकारी आणि उपस्थितांचे आभार निलेश साळुंखे यांनी मानले.
स्रोत:(उद्घाटन कार्यक्रम)






