ॲड. प्रदिपराजे खामगळ यांच्या गाड्यांना महिनाभरात दोनदा विचित्र अपघात; घातपाताचा संशय, पोलीस संरक्षणाची करणार मागणी..

दिनांक १२ जून २०२६, श्रीगोंदा:

श्रीगोंद्यातील प्रसिद्ध व्यावसायिक आणि कायदेतज्ज्ञ ॲड. प्रदिपराजे खामगळ यांच्या गाड्यांना गेल्या महिनाभरात दोन मोठे विचित्र अपघात झाल्‍याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गेल्या २०२६ मे महिन्यात झालेल्या अपघातानंतर, आज पुन्हा तशाच प्रकारची घटना घडल्याने शहर आणि परिसरात खळबळ उडाली असून, यामागे एखादा मोठा घातपात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आपल्या जीविताला धोका निर्माण झाल्याचा संशय व्यक्त करत ॲड. खामगळ लवकरच अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षकांची (SP) भेट घेऊन या दोन्ही घटनांची सखोल चौकशी करण्याची आणि पोलीस संरक्षणाची मागणी करणार आहेत.

दिनांक ५ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास नॅशनल हायवे ५४८-डी वर भावडी दांगडे विटभट्टीजवळ हा अपघात झाला होता. श्रीगोंद्याकडून जामखेडकडे जाणाऱ्या एका भरधाव ब्लॅक स्कार्पिओने ॲड. प्रदिप खामगळ यांच्या मालकीच्या टाटा नेक्सन गाडीला जोरदार धडक दिली होती. सुदैवाने या अपघातात ॲड. खामगळ, त्यांचा मुलगा रामराजे, मुलगी प्रियदर्शनी, पुतणी वृषाली व सहकारी असे पाचही जण सुखरूप बचावले होते.

या पहिल्या घटनेनंतर साधारण एक महिन्यानंतर म्हणजेच आज, १२ जून २०२६ रोजी सकाळी ठीक १०:००  वाजता श्रीगोंदा पंचायत समितीसमोर दुसरा अपघात घडला. वैष्णवी कन्स्ट्रक्शनच्या एका टाटा हायवा ट्रकने ॲड. प्रदिप खामगळ यांच्या मालकीच्या हुंडाई व्हेर्ना गाडीला पाठीमागून जोराची धडक दिली. या वेळी गाडीमध्ये ॲड. प्रदिप खामगळ, मुलगा रामराजे आणि त्यांचे सहकारी प्रवास करत होते. याही अपघातात सुदैवाने सर्वजण सुखरूप राहिले असून कोणालाही दुखापत झालेली नाही.

ॲड.प्रदिप खामगळ हे २०१९ मध्ये व्यवसायाच्या निमित्ताने श्रीगोंदा शहरात आले होते. सुरुवातीला त्यांनी शनिचौक आणि तहसील परिसरात एक छोटा टायपिंगचा व्यवसाय सुरू केला. मात्र, आपल्या कष्टाच्या आणि व्यावसायिक कौशल्याच्या जोरावर त्यांनी जमीन खरेदी-विक्री (रिअल इस्टेट) क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रगती केली.

२०२३ नंतर त्यांनी श्रीगोंदा, कोळगाव आणि काष्टी या मोठ्या गावांमध्ये भव्य प्लॉटिंगचे प्रोजेक्ट्स उभे केले. इतकेच नव्हे तर २०२५ पासून त्यांनी थेट पुणे शहरात बांधकाम व्यवसायात (कन्स्ट्रक्शन) मोठी झेप घेतली. एका सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबातील युवकाने अवघ्या ५ ते ६ वर्षांत मिळवलेले हे नेत्रदीपक यश आणि आर्थिक प्रगती अनेकांच्या डोळ्यात खुपत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अल्पावधीत मिळालेल्या या यशाचाच वावडे म्हणून काही घटकांकडून ॲड. खामगळ यांना लक्ष केले जात आहे का? अशी शंका आता उपस्थित केली जात आहे. वेगवेगळ्या गाड्यांना झालेल्या या दोन विचित्र अपघातांमुळे त्यांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

“माझ्या गाड्यांना वारंवार होणारे अपघात ही अत्यंत गंभीर बाब आहे. मागील महिन्याच्या घटनेनंतर आज पुन्हा तसाच प्रकार घडल्याने या घटनांमागे नक्कीच काहीतरी घातपात असण्याची दाट शक्यता वाटते. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि मला व माझ्या कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावे, यासाठी मी स्वतः जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन देणार आहे.”
— ॲड. प्रदिपराजे खामगळ

या अपघातांमागे नेमके कोण आहे आणि हा केवळ योगायोग आहे की पूर्वनियोजित कट .? याचा शोध घेणे आता पोलिसांसमोर आव्हान असणार आहे. या घटनेमुळे श्रीगोंद्यातील व्यावसायिक वर्तुळात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती नुसार)

दोन्ही अपघातग्रस्त गाड्यांचे फोटो…

Leave a Reply