वीज कोसळून २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; शेतात वडिलांसोबत काम करत असताना घडली घटना..

दिनांक २२ जून २०२६,श्रीगोंदा:

तालुक्यातील घोडेगाव येथे आज दुपारी एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास अचानक सुरू झालेल्या पावसादरम्यान अंगावर जोराची वीज कोसळल्याने अभिषेक रूपचंद दरेकर या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण घोडेगाव आणि परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (२२ जून) दुपारी अभिषेक आपल्या वडिलांसोबत ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतात काम करत होता. दुपारी पावणेतीनच्या सुमारास अचानक ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला.

याच वेळी अचानक एकाएकी कडाडत आलेली वीज थेट अभिषेकवर कोसळली. वीज इतकी जोरदार होती की, त्याच्या गालावरून, छातीवरून आणि पायातून गंभीर जखमा करत ती जमिनीमध्ये गेली. यात अभिषेक गंभीररीत्या भाजला व जखमी झाला.

घटनेनंतर अत्यंत गंभीर अवस्थेत अभिषेकला तातडीने उपचारासाठी श्रीगोंदा येथील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी करून तो उपचारादरम्यान मयत असल्याचे घोषित केले.

वडिलांसोबत शेतात राबणाऱ्या तरुण मुलाचा डोळ्यादेखत अशा अपघाती निधनाने दरेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातून तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे.

स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading