दिनांक २० जुलै २०२६ श्रीगोंदा/फलटण:
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील श्रीगोंदा (विसापूर) येथील महिला वारकरी उषा रमेश जठार या नातेपुते येथे गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना फलटणच्या ‘लाईफ लाईन’ रुग्णालयात नेले असता, तिथल्या पलाश कांबळे यांनी उपचारासाठी दाखल करण्यास स्पष्ट नकार दिला.
समाजसेवक सचिन गानबोटे यांनी तातडीने हस्तक्षेप करत त्यांना जे. टी. हॉस्पिटलमध्ये हलवले. तेथे सीटी स्कॅनमध्ये मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याचे निदान झाले. वेळीच उपचार मिळाल्याने महिलेचा जीव वाचला.
मात्र, गंभीर रुग्णाला नकार देणाऱ्या संबंधित रुग्णालयावर कारवाईची मागणी वारकरी संघटनांकडून होत आहे. संकटकाळात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी फोन न उचलल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
